अंबिका योग कुटीरच्या कॅन्सर सपोर्ट ग्रुपतर्फे २५ डिसेंबरला योग आणि कॅन्सर शिबीराचं आयोजन

अंबिका योग कुटीरच्या कॅन्सर सपोर्ट ग्रुपतर्फे २५ डिसेंबरला योग आणि कॅन्सर शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या सर्व साधकांना एकत्रित आणून विशेष मार्गदर्शन व्हावं आणि कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळावा या उद्देशानं या शिबीराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. अंबिका योग कुटीरचे ठाणे, विलेपार्ले, बोरीवली आणि वाशी असे ४ कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहेत. १६० साधक यामध्ये सातत्यानं योगाभ्यास करतात. या पत्रकार परिषदेत कॅन्सर बरा झालेल्या दोन महिलांनी आपले अनुभव कथन केले. हे शिबीर नि:शुल्क असून यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. या शिबीरामध्ये बिहार योग स्कूलच्या स्वामी निर्मलानंद सरस्वती यांचे विशेष मार्गदर्शन आणि योगनिद्रेचा अभ्यास याचा लाभ शिबीरार्थींना मिळेल. विशेष म्हणजे या शिबीराचे अंबिका योग कुटीरच्या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी ९८१९१६१००५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: