ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तासासाठी बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या ११०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील मेट्रो कामांतर्गत हरदासनगर येथे व्हॉल्व्ह बदलणे तसंच साकेत पूलाखाली मुख्य वाहिनीवरील जोडणीचा व्हॉल्व्ह बदली करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. उद्या म्हणजे ४ डिसेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून शनिवार ५ डिसेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळं सिध्देश्वर, जॉन्सन, समतानगर, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतूपार्क, घोडबंदर रस्ता, कोठारी कंपाऊंड, इंदिरानगर, लोकमान्यनगर, गांधीनगर, किसननगर, श्रीनगर, वागळे इस्टेट, आणि कळवा-मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading