जिल्ह्यात आज कोरोनाचे १६०० नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ६०० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ हजार १४१ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ३ हजार ९८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख २७ हजार ३३६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख ४९ हजार ४४० पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३ हजार ५६० रूग्ण उपचार घेत असून २६ हजार ४३६ कोरोना रूग्ण बरे झाले तर ९०७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार २०१ रूग्ण उपचार घेत असून ३० हजार १९१ बरे झाले तर ७३९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४६३ रूग्ण असून २७ हजार १८२ बरे झाले तर ६७१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये २ हजार १२७ रूग्ण उपचार घेत असून १२ हजार ९८१ कोरोनातून बरे झाले तर ४८३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ४८६ रूग्ण असून ७ हजार ६०८ बरे झाले तर २५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २२७ रूग्ण उपचार घेत असून ४ हजार २७ कोरोनातून बरे झाले तर २९५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ४२० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ४ हजार ९५७ बरे झाले तर २०९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ४२१ रूग्ण असून ४ हजार ६७३ कोरोनामुक्त झाले तर ७३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार २३६ रूग्ण असून ९ हजार २६१ बरे झाले तर ३५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading