सॅटीस (पूर्व) प्रकल्पाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन

ठाणे पूर्वेकडील वाहतूक कोंडीवर उतारा ठरणा-या ठाणे (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस (पूर्व) प्रकल्पाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पांमुळे कोपरी भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. ठाणे पश्चिमेकडील सॅटीसच्या धर्तीवर पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात सॅटीस (पूर्व) हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.रेल्वेची जागा असल्याने गेली अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरु होता. राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिकेच्या मंजुरीनंतर पूर्व परिसराचा वाणिज्यिक विकास करण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीही प्राप्त झाल्या होत्या.त्यांनंतरच या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्गी लागले. सॅटीस (पूर्व) या प्रकल्पातंर्गत 3 किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात येणार असून ठाणे रेल्वे स्टेशन(पूर्व) ते द्रुतगती मार्गास थेट जोडण्याबरोबरच नवीन प्रस्तावित उपनगरीय स्टेशनला हा मार्ग जोडण्यात येणार आहे.विशेष म्हणजे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

Leave a Comment

%d bloggers like this: