शारदीय नवरात्रौत्सवास ठिकठिकाणी प्रारंभ

शारदीय नवरात्रौत्सवास आज ठिकठिकाणी प्रारंभ झाला. ठाण्यातील गांवदेवी आणि घंटाळी मंदिरामध्येही नवरात्रौत्सवास सुरूवात झाली. घंटाळी येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते सकाळी घटस्थापना करण्यात आली. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. आज सकाळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात देवीच्या मूर्तीला दुग्धस्नान घालून देवीची पूजा करण्यात आली. यावेळी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते. नवरात्रौत्सवाच्या काळात घंटानाद, आरती, भजन-किर्तन, पठण असे कार्यक्रम होणार असल्यानं इथलं वातावरण मंगलमय आणि पवित्र झालं आहे. नवरात्रौत्सवात विद्येची सरस्वती, धनसंपत्तीची महालक्ष्मी तर दुर्जनांचा नाश करणा-या महाकालीची पूजा केली जाते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading