रुंदीकरण केलेल्या फलाटावर थांबली पहिली ट्रेन

ठाणे स्थानकात घेण्यात आलेला 63 तासांचा जंबो मेगा ब्लॉक संपला आहे असे मध्य रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री नंतर पहिली लोकल सव्वा एक वाजण्याच्या समारास या प्लॅटफॉर्म वर थांबली आहे

नवीन रुंदीकरण केलेल्या प्लॅटफॉर्म वर ही लोकल थांबली, प्रवासी देखील या लोकल मधून उतरले आणि चढले आहेत

आता येणाऱ्या सर्व लोकल या प्लॅटफॉर्म वर थांबतील

तर दुसरीकडे सी एस एम टी इथे सुरू असलेला 36 तासांचा मेगा ब्लॉक देखील संपला आहे, त्यामुळे आता प्रवासी सी एस एम टी ते ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा असा प्रवास करू शकतात

    Discover more from Thanevarta

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue Reading