यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत मासिक पाळीबाबत जनजागृती होणार

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत मासिक पाळीबाबत जनजागृती होणार आहे. तर मराठी ग्रंथ
संग्रहालयाच्यावतीने पु. ल. देशपांडे यांच्या जनशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून त्यांच्यावर आधारीत चित्ररथ सहभागी होणार आहे.श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक झाली. यावेळी विविध संस्थांच्या सहभागाचा आढावा घेण्यात आला. सरस्वती मंदिर ट्रस्टच्यावतीने जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके आणि मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागाकडून विद्यार्थी बस मधून सहभागी होणार आहेत. शून्य कचरा या विषयावर चित्ररथ तर एसटी लव्हर ग्रुपच्यावतीने नवीन रु पात आलेली एसटीची बस, तसेच, यंदा जोशी बेडेकर महाविद्यालयाला ५० वर्षे पूर्ण झाली असून महाविद्यालयाच्यावतीने एक चित्ररथ साकारण्यात येणार असून त्यात जवळपास ३०० विद्यार्थी सहभागी ोणार आहेत. तर न्यू इंडिया इन्शुरन्स, मराठा मंडळ, तेली समाज अशा विविध संस्था सहभागी होणार आहेत.गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ ते ७ या वेळेत कौपीनेश्वर मंदिराच्या प्रांगणात समस्त ठाणेकर, राष्ट्र सेविका समिती महिला पौरोहित्य वर्गाचे सामुदायिक अथर्वशीर्ष, शिवमहिम्न, रुद्र पठण होणार असून कला, नृत्य, नाट्य, संगीत यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत दीपोत्सव होणार असून यावेळी स्वातंत्र्य देवता आणि गंगा आरती होणार आहे.यंदा ६ एप्रिल रोजी गुढीपाडवा असून सकाळी ७ वा. श्री कौपीनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही स्वागतयात्रेचा समारोप गडकरी रंगायतनच्या आवारात होणार आहे.यंदाच्या स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुहास मेहता आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading