माय ठाणे फेस्टीवलमध्ये सुहास जोशी यांना चित्ररत्न तर मैथिली पटवर्धन हिला रायझिंग स्टार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार

माय ठाणे फेस्टीवलमध्ये सुहास जोशी यांना चित्ररत्न तर मैथिली पटवर्धन हिला रायझिंग स्टार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ब्लू एन्टरटेन्मेंट आणि सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं चौथा माय ठाणे फेस्टीवल १५ आणि १६ डिसेंबर रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते या फेस्टीवलचं उद्घाटन होणार आहे. देशभरातून दीडशेपेक्षा जास्त लघुचित्रपटांचा या फेस्टीवलमध्ये समावेश असून त्यापैकी निवडक ६३ लघुपटांचे स्क्रीनींग यावेळी होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गायक सुखविंदरसिंग यांच्या व्हीडीओ अल्बमचाही या स्पर्धेत खास समावेश आहे. या महोत्सवादरम्यान लघु चित्रपटासाठी विविध प्रकारची ३३ बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. तसंच एकपात्री अभिनय स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टीवलमध्ये सुप्रसिध्द अभिनेत्री सुहास जोशी यांना चित्ररत्न पुरस्कार तर बालकलाकार जागो मोहन प्यारे फेम माऊ उर्फ मैथिली पटवर्धनला रायझिंग स्टार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ब्लू एन्टरटेन्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading