माघी गणेशोत्सवास आजपासून सुरूवात

आज श्री गणेश जयंती. माघी गणेशोत्सवास आजपासून सुरूवात झाली. श्री गणेश जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं दिसत होतं. ठाण्यामध्ये कचराळी तलाव येथील श्रीगौरीशंकर सिध्दीविनायक मंदिरातही माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठाण्यामध्ये नौपाडा सार्वजनिक मंडळ, विष्णूनगर, बी-केबीन, लोकमान्यनगर अशा विविध ठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. नौपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा 88 व्या वर्षात पदार्पण केलं असून तीन पिढ्यांचा गणेशोत्सव म्हणून साजरा होणा-या या गणेशोत्सवातील गणपतीचं जल्लोषात आगमन झालं. 1931 साली हा गणेशोत्सव सुरू झाला.

Leave a Comment

%d bloggers like this: