मकरसंक्रांतीचं मुख्य आकर्षण म्हणजे गूळपोळी

मकरसंक्रांतीचं मुख्य आकर्षण म्हणजे गूळपोळी. मकरसंक्रांतीला सर्वांच्याच घरी गूळपोळीचा बेत आखला जातो. गुळाची पोळी घरी तयार करण्याची पध्दत आता हळूहळू बंद होऊ लागल्याचं दिसत असून सध्या घराघरातून विकतच्या पोळ्या आणणंच पसंत केलं जातं. गुळाच्या पोळ्या करण्यासाठी लागणारी मेहनत आणि पोळी जमली नाही तर घरातून होणारी टीका यापेक्षा गृहिणी बाजारातूनच गुळाच्या पोळ्या आणणं पसंत करत असल्याचं दिसत आहे. सध्या गुळाच्या पोळ्यांचा भाव प्रतिनगाला २५ रूपयांपासून ३० रूपयांपर्यंत आकारला जात आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: