परिवहन सेवेची प्रस्तावित भाडेवाढ समिती सदस्यांनी फेटाळली

परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेली भाडेवाढ फेटाळण्यात आली आहे. परिवहन सेवेचा अर्थसंकल्प सादर करताना परिवहन व्यवस्थापकांनी अर्थसंकल्पात २० टक्के भाडेवाढ प्रस्तावित केली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही भाडेवाढ परिवहन सदस्यांनी फेटाळली आहे. परिवहन सेवेच्या तिकिट दरात २ ते १० रूपयापर्यंतची वाढ सुचवण्यात आली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सुचवण्यात आलेली भाडेवाढ अडचणीची ठरू शकते हे लक्षात आल्यावर परिवहन समितीतील शिवसेनेच्या सदस्यांनी ही भाडेवाढ फेटाळून लावली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: