दसरा हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त असल्यानं या मुहुर्तावर सोनं खरेदीची प्रथा आहे. सोन्याच्या खरेदीसाठी आज ग्राहकांनी सराफांच्या दुकानात गर्दी केली होती. मध्यमवर्गीयांमध्ये गुरूपुष्यामृत आणि इतर मुहुर्तांवर एक ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. ठाण्यातील अनेक नामवंत सराफी पेढ्यांनी सोन्याची वळी, नाणी खरेदीसाठी खास व्यवस्था केली होती. सोन्याच्या दरामध्ये यंदा १२ टक्के वाढ झाली असून सोन्याचा दर ३२ हजाराच्या वर गेला असतानाही सोने खरेदीसाठी सराफा पेढ्यांवर गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं.
