त्रिपुरारी पौर्णिमेस कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

त्रिपुरारी पौर्णिमेस कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यास सांपत्तिक स्थिती सुधारते. पैशांची ददात राहत नाही असं मानलं जातं. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेस कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटते. ठाण्यात कार्तिक स्वामींचं स्वतंत्र मंदिर नाही पण ठाणे पूर्व भागातील कोपरी परिसरात असलेल्या शंकर मंदिरात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींना महत्व असल्यामुळं ही मूर्ती दर्शनासाठी पुढे आणली जाते. या मंदिरात कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. कार्तिक स्वामींना मोराचं पीस आवडत असल्यामुळं काही भक्त मोराचं पीस कार्तिक स्वामींना वाहताना दिसत होते. मुलुंडमध्येही कार्तिक स्वामींचं मंदिर असून भाविकांनी तिथेही कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

Leave a Comment

%d bloggers like this: