ठाण्यामध्ये ९ मार्चला होणारं लोक न्यायालय आता १७ मार्च रोजी होणार

ठाण्यामध्ये ९ मार्चला होणारं लोक न्यायालय आता १७ मार्च रोजी होणार आहे. ही माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी दिली. ठाणे आणि पालघर मधील सर्व तालुका, कौटुंबिक, कामगार आणि सहकार न्यायालयामध्ये हे लोक न्यायालय होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र, फौजदारी स्वरूपाची, १३८ अन्वये दाखल झालेली प्रकरणं, बँक वसुली प्रकरणं, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणं, कौटुंबिक वाद, महसुली आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: