ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार रेगे यांचं अल्पशा आजारानं निधन

ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार रेगे यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. ठाणे डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. गृहनिर्माण सोसायट्यांच्या नियमावलीचा त्यांचा गाढा अभ्यास होता. या विषयावर ते अनेक वृत्तपत्रात लिहीतही होते. नंदकुमार रेगे हे हौसिंग सोसायटी कायद्याची माहिती असलेला चालता-बोलता ग्रंथ होते. त्यांच्या मागे पत्नी, आणि दोन मुलं असा परिवार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: