ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात २० टक्के दरवाढ प्रस्तावित

ठाणे परिवहन सेवेचा २० टक्के भाडेवाढ सुचविणारा ४७६ कोटींचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी परिवहन समितीस सादर केला. परिवहन सेवेचा गाडा रूळावर आणण्यासाठी ही भाडेवाढ सुचविण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेचा २०१९-२०२० चा ४७६ कोटी १२ लाखांचा अर्थसंकल्प असून १७७ कोटी रूपयांचं उत्पन्न विविध माध्यमातून यामध्ये अपेक्षित धरण्यात आलं आहे. या अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यापोटी १६३ कोटी, जाहिरात भाड्यापोटी ३ कोटी, विद्यार्थी पास १ कोटी, निरूपयोगी वाहन वस्तू विक्रीतून अडीच कोटी, पोलीस खात्याकडून प्रतिपूर्ती प्रलंबित ४ कोटी आणि इतर किरकोळ उत्पन्न २ कोटी असं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे २० टक्के भाडेवाढीतून ९ कोटी ३५ लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. बस खरेदी आणि दुरूस्तीसाठी १६ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सेवानिवृत्त निधी १० कोटी, त्यापैकी ७ कोटींचं महसुली अनुदान, परिवहन सेवेच्या बसेससाठी डिझेल आणि सीएनजीकरिता ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विविध सरकारी करापोटी साडेबारा कोटी, निवृत्त कर्मचा-यांच्या देण्यापोटी २ कोटी रूपये अनुदान म्हणून पालिकेकडे मागण्यात आलं आहे. परिवहन व्यवस्थापकांनी जरी भाडेवाढ सुचवली असली तरी या भाडेवाढीला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिल्यानंतरच ही भाडेवाढ लागू होणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: