ठाणे परिक्रमाचे संचालक श्रीराम भिडे यांचं निधन

ठाणे परिक्रमाचे संचालक श्रीराम भिडे यांचं काल दु:खद निधन झालं. ते ५८ वर्षाचे होते. श्वास घेता येत नसल्याच्या तक्रारीवरून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिल्हा शासकीय रूग्णालयात आयसीयू नसल्यामुळे त्यांना लाईफलाईन रूग्णालयात हलवताना लिफ्टमध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भिडे हे साधारणत: २५ वर्षापूर्वी मुलुंडहून ठाण्यात रहायला आले. त्यांनी नाटक, चित्रपट अशा विविध क्षेत्रात काम केलं. आता जरी सगळं संगणकावर होत असलं तरी संगणक नसताना त्यांनी व्हीसीआर वर संपादन करण्याचं काम केलं. म्यॅन्युअली संपादन करण्याचं उत्तम कौशल्य भिडे यांच्याकडे होतं. ठाणे वार्ताच्या सुरूवातीला त्यांनी ठाणे वार्तामध्ये काम केलं. नंतर त्यांनी ठाणे समाचार म्हणून नवीन बातमी पत्र सुरू केलं. त्यानंतर त्यांनी ठाणे परिक्रमा हे स्वत:चं दृकश्राव्य माध्यम चालवलं. भिडे यांच्या अचानक मृत्यूमुळे पत्रकारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर काल माजिवडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पत्रकार मित्र, सहकारी तसंच पालिकेच्या अधिका-यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: