ठाणे न्यायालयाच्या आवारात तक्रार मागे घ्यावी म्हणून तक्रारदाराला धमकावण्याचा प्रकार

ठाणे न्यायालयाच्या आवारात तक्रार मागे घ्यावी म्हणून तक्रारदाराला धमकावण्याचा प्रकार घडला आहे. रविंद्र द्विवेदी यांचा मीरारोड येथे वाहतुकीचा व्यवसाय असून गेल्या ३० वर्षापासून भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशी त्यांची संस्था आहे. या संस्थेचे द्विवेदी स्वत: अध्यक्ष असून जयस्वाल आणि गीता राऊत हे संस्थेचे इतर सदस्य आहेत. या दोन सदस्यांनीच भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आल्यानं त्यांना दोन वर्षापूर्वी संस्थेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याच रागातून या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसह द्विवेदी आणि त्यांचा मुलगा आलोक आणि नासीर नुरानी हे न्यायालयात सुनावणीसाठी आले असता त्यांना न्यायालयात येण्यापासून मज्जाव केला तसंच आपल्या विरोधातील तक्रारी मागे न घेतल्यास ठार मारू अशी दमदाटी करून आत्ता जिवंत सोडत आहोत याबाबत कुठेही तक्रार करू नये अशी धमकी देत सर्वजण न्यायालयातून निघून गेले. द्विवेदी यांनी याबाबत न्यायालयाकडे तक्रार केली होती. न्यायालयानं ठाणे नगर पोलीसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने काल या दोघांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: