ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अप्पा उर्फ प्रकाश कदम यांची निवड

ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत अप्पा उर्फ प्रकाश कदम यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. कदम यांच्या गळ्यात पुढील २ वर्षासाठी अध्यक्षपदाची माळ पडली आहे. अप्पा कदम आणि प्रदीप टिल्लू यांच्यामध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. काल झालेल्या मतमोजणीत अप्पा कदम अध्यक्षपदी निवडून आले. ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक यंदा प्रथमच वन बार वन व्होट या नव्या संकल्पनेवर झाली. ठाणे जिल्हा न्यायालयात ३ हजाराहून अधिक वकील असताना सुमारे १८०० वकीलांनी वन बार वन व्होट या संकल्पनेनुसार प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळं हे वकील या निवडणुकीत मतदार ठरले. ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी इंद्रपाल पाटील, सचिव म्हणून संजय म्हात्रे, सहसचिव म्हणून संदीप डोंगरे, सहसचिव महिला रेखा हिवराळे, खजिनदार म्हणून गणेश नलावडे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रूपाली म्हात्रे, पूजा सिंग, रूपाली शिंदे, राजाराम तारमाळे आणि विकास जोशी यांची निवड झाली. निवड जाहीर होताच वकील वर्गानं एकच जल्लोष केला. निकालानंतर रात्री उशिरा अध्यक्ष उपाध्यक्षांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading