गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर

गंधार कला संस्थेतर्फे दिला जाणारा गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे. येत्या बालदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. बालनाट्य भूमीसाठी कार्य करणारे लेखक रत्नाकर मतकरी आणि विद्याताई पटवर्धन यांना यापूर्वी गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. गंधार कलासंस्थेचे संस्थापक प्रा. मंदार टिल्लू यांनी गंधार गौरव पुरस्काराची माहिती दिली. बालनाट्य लिहिणे, त्यात भूमिका करणे, त्याचं दिग्दर्शन करून बाल प्रेक्षकांसमोर आणणं ही बाब सोपी नाही. दिलीप प्रभावळकरांसारख्या कलाकारानं त्यांच्या भूमिकेनं बालनाट्य भूमी गाजवली आहे. त्यामुळं त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ११ हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती अशोक समेळ यांनी दिली. या गौरव पुरस्कार सोहळ्यात दीडशे बाल कलाकार मराठी चित्रपट गीतांचा इतिहास आपल्या कलाभिनयानं जिवंत करणार आहेत. याच कार्यक्रमात व्यावसायिक बाल नाट्य स्पर्धेचं पारितोषिक वितरण होणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: