कोकण चषक २०१८ एकांकिका स्पर्धेत रूईया महाविद्यालयाच्या एका दशावतार या एकांकिकेस प्रथम क्रमांक

सांस्कृतिक कार्यसंचालनालय आणि कोकण कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या कोकण चषक २०१८ या एकांकिका स्पर्धेत रूईया महाविद्यालयाच्या एका दशावतार या एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला आहे. काल या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी झाली. रेनबोवाला या एकांकिकेस द्वितीय, तुरटी या एकांकिकेस तृतीय तर फाईंडिंग खड्डा या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पुरूष गटात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक श्रीनाथ म्हात्रे, द्वितीय क्रमांक शिवराम गावडे तर तृतीय क्रमांक ओमकार राऊत यांना मिळाला. महिला गटात सायली वीरकरला प्रथम, कोमल वंजारेला द्वितीय तर मनाली राजश्रीला तृतीय क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं प्रथम पारितोषिक एका दशावतार या एकांकिकेला, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रेनबोवाला या एकांकिकेच्या हर्षल आणि राकेश यांना तर तृतीय पारितोषिक तुरटी एकांकिकेच्या रोहित मोहिते आणि रोहित कोतेकर यांना मिळालं. सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून चौकट एकांकिकेचे मोहन बनसोडे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य एका दशावतार, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत एका दशावतार तर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचं पारितोषिक रेनबोवाला एकांकिकेच्या अमोल फडके यांना मिळालं.

Leave a Comment

%d bloggers like this: