कल्याण लोकसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयाच्या दिशेने

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. श्रीकांत शिंदे यांना ३ लाख ७८ हजार ६५१ मतं मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना १ लाख ९६ हजार ७२५ मतं मिळाली आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे १ लाख ८१ हजार ९२६ मतांनी आघाडीवर आहेत. श्रीकांत शिदे यांना मिळालेल्या मोठ्या आघाडीमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात ७ हजार ५३३ नोटा म्हणजे कोणालाही नाही अशी नोंद झाली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading