उद्याच्या दिवाळी पाडव्याचे वही पूजनाचे मुहुर्त

दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे पाडवा उद्या असुन या दिवशी विक्रम संवत २०७५ संवत्सराचा प्रारंभ होत आहे. तसेच महावीर जैन संवत २५४५ चा प्रारंभ होत आहे. उद्या सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपासून ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत शुभ सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत चल तर दुपारी १२ वाजून २४ मिनिटांपासून ते १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत लाभ, दुपारी १ वाजून ४९ मिनिटांपासून ते ३ वाजून १३ मिनिटांपर्यंत अमृत आणि सायंकाळी ४ वाजून ३८ मिनिटांपासून ते ६ वाजून १ मिनिटांपर्यंत शुभ या चौघडीमध्ये व्यापा-यांनी वहीपुजन आणि लेखन करावे असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. पाडवा हा साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त असल्यामुळं यादिवशी एक मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. गुजराती मंडळी पाडव्याच्या दिवशी सकाळी सर्वात प्रथम मीठ खरेदी करतात. मीठामुळं जेवणाची चव वाढत असल्यामुळं मीठाला अमृत समजलं जातं. म्हणून सकाळी उठल्यावर प्रथम मीठ खरेदी करण्याची प्रथा काही लोकांकडे असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: