महापालिकेच्या सर्वच दवाखान्यात औषधांचा प्रचंड तुटवडा

एकीकडे शहरात सर्दी, खोकला आणि तापाची साथ सुरू आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेच्या सर्वच दवाखान्यात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तर आपला दवाखाना मध्ये वैद्यकीय अधिकारी गायब असल्याचा पर्दाफाश विरोधीपक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी केला.

Read more

एमएमआरडीए प्रकरणात समिती न नेमल्यास सोमवारपासून उपोषण करण्याचा विरोधी पक्षनेत्यांचा इशारा

येत्या सोमवारपर्यंत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती न नेमल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे.

Read more

एमएमआरडीएने दिलेल्या घरांच्या वाटपात महापालिकेकडून घोटाळा चौकशी समिती नेमण्याची शानू पठाण यांची मागणी

ठाणे महापालिकेच्या वतीने बाधितांचे पुनर्वसन करताना घरे देण्यात आली आहेत. एमएमआरडीए ने महापालिकेकडे घरे वर्ग केली असून घरांचे वाटप करण्यात आले. सन २०१६ मधील रस्ता रूंदीकरणातील बाधितांना घरे दिली. या प्रकरणात पालिकेकडून गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

नागरी सुविधा पुरविण्यात सक्षम नाही असा फलक लावा – विरोधी पक्षनेत्यांची टीका

नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेकडे निधी नसेल तर पालिका प्रशासनाने दिवाळखोरी जाहीर करुन नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम नसल्याचे फलक लावावेत अन्यथा असे फलक आपणच लावू अशी टीका विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली.

Read more

मुंब्रा- कौसा भागातील सर्व धार्मिक स्थळांचे शानू पठाण यांच्याकडून निर्जंतुकीकरण

सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आलेली आहेत. या धार्मिक स्थळांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी मुंब्रा- कौसा भागातील सर्व धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले.

Read more

महापालिकेत मोठा जमीन घोटाळा असल्याचा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा आरोप

ठाणे महापालिकेत मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. गेले 42 वर्षे महापालिकेचा ताबा असलेल्या भूखंडाच्या सातबा-यावर महापालिकेचं नाव नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या भूखंडावर महापालिकेची शाळा होती. मात्र आता हा भूखंड एका खासगी ट्रस्टला देण्याचा घाट घातला आहे. 15 हजार चौरस मीटरचा कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड ठाणे पालिकेने ताब्यात घेऊन त्यावर धर्मवीर आनंद दिघे’ यांच्या नावाने शाळा किंवा महाविद्यालय उभारावे अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे.

Read more

टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातून ठाणेकरांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघड

टेमघर जलशुद्धीकरणातील ही यंत्रणा येत्या आठ दिवसात जर पालिकेने सुधारली नाही. तर पालिका प्रशासनावर ‘पाणी फेको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे.

Read more

मुंब्रा आणि शिळ-दिव्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार

कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी ठेकेदारांनी कामे प्रलंबित ठेवल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा ठेकेदार, अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यांना समज देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी दिली.

Read more

ग्लोबल कोविड सेंटरमधील 46 डॉक्टरांना कमी करण्याचा घाट – विरोधी पक्षनेत्यांचा आंदोलनाचा इशारा

कोरोनाचा कहर माजलेला असताना जीवावर उदार होऊन सेवा बजावणार्‍या सुमारे 46 डॉक्टरांना अचानक कमी करण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. त्यापैकी 38 डॉक्टरांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने डॉक्टरांना कामावरुन कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. गरज सरो आणि वैद्य मरो ही महापालिकेची निती आहे. या सर्व डॉक्टरांना सेवेत कायम करुन घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.

Read more

झाडे कोसळलेल्या ठिकाणांना भरपावसात विरोधीपक्ष नेत्यांची भेट

तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्‍यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी भेटी दिल्या. ही झाडे कोसळण्याचे प्रकार ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणामुळेच झाले आहेत. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी भावी काळात एखाद्याचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण असेल? असा सवाल करुन जर वृक्षप्राधिकरण खात्याचे काम जर अग्नीशमन दलाकडून केले जात असेल तर हे खाते हवेच कशाला, ते बरखास्त करुन टाका, अशा शब्दात शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला.

Read more