ठाण्यात सद्यस्थितीत १४७३ कोरोनाचे अॅक्टीव्ह रूग्ण

ठाण्यात सद्यस्थितीत १४७३ कोरोनाचे अॅक्टीव्ह रूग्ण असून आज १६४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोपरीमधील विकास योजनेतील रस्त्याचे नियोजन रद्द करण्याची मागणी

ठाणे पूर्व भागात असणाऱ्या कोपरी येथील शांतीनगर रस्त्याचे विकास योजनेतील रस्त्याचे नियोजन रद्द करून त्या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागी करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे आणि एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर आणण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश

ठाणे आणि एमएमआर प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असून त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा विकासांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले.

Read more

भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनोखे रांगोळी प्रदर्शन

भारतीय जनता पक्ष आणि कलाछंद रांगोळीकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखे रांगोळी प्रदर्शन कोपरीतील विद्यासागर विद्यालयात आयोजीत करण्यात आले आहे.

Read more

घोडबंदरच्या सर्विस रोडच्या रखडलेल्या कामाची खासदार राजन विचारेंकडून पाहणी

ठाणे शहरातील वाढते शहरीकरण आणि घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने हायवे पूर्वद्रूत गती महामार्गाच्या शेजारी सुरू केलेल्या सर्विस रोड मार्गासाठी ४ ठिकाणी असणाऱ्या जागा संजय गांधी उद्यानाच्या हद्दीत येत असल्याने परवानगी न मिळाल्याने ही कामे वर्षभरापासून रखडली होती खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य वनसंरक्षक आणि महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे ५६५ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ५६५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला.

Read more

मुंब्र्यात आज शून्य रूग्ण

ठाण्यात आज १६० रूग्ण सापडले तर मुंब्रयात आज एकही रूग्ण सापडला नाही आणि माजिवडा-मानपाडामध्ये ४७ रूग्ण सापडले.