पारंपारिक वेशभूषा, लोकसंगीतांमध्ये रंगला कोळी महोत्सव

पारंपारिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठया उत्साहात पार पडला.

Read more

देशाच्या पंतप्रधानानी भारतीय सैन्य दलात सुरू केलेल्या सुविधांमुळे तरुण वर्गाला भरतीची मोठी संधी – आमदार संजय केळकर

भारतीय सैन्य दलात भरती होऊन लेफ्टनंट पदी निवड झालेल्या लेफ्टनंट स्वराज बने यांचा शौर्य डिफेन्स अकॅडमी आणि महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला.

Read more

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांना भेट

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेली नडगाव क्लस्टरमधील कामे, वनराई बंधाऱ्यांची कामे तसेच जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कार्ड वाटप आदी शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या उपक्रमांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.

Read more

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

कोपरी सिध्दीविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली.

Read more

तीन नायजेरीयन व्यक्तींना साडे सत्तावीस लाखाहून अधिक किंमतीच्या अंमली पदार्थांसह जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश

तीन नायजेरीयन व्यक्तींना साडे सत्तावीस लाखाहून अधिक किंमतीच्या अंमली पदार्थांसह जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश मिळालं आहे.

Read more

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मानके आणि उत्पादन या विषयावर प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे. यासाठी मानके आणि उत्पादनांचे या विषयावर प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या नवीन बसेस दाखल होणार

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या २० नवीन बसेस दाखल होणार आहेत.

Read more

सहायक आयुक्तांना दमदाटी करणाऱ्यालाच ठाणे महापालिकेने केला गाळा बहाल

महापालिकेच्या सहायक आयुक्ताला दमदाटी केल्यानंतर तुरुंगात गेलेल्या फेरीवाल्यालाच महापालिकेने गावदेवी भाजी मंडईतील दुकान बेकायदेशीररित्या बहाल केले आहे.
महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने केलेला हा धक्कादायक गैरव्यवहार भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी उघड केला आहे. तसेच या प्रकरणी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

गावदेवी मंडईत १५४ ओटले (गाळे) उभारण्यात येणार होते. मात्र, तेथे १५५ गाळे उभारले गेले. त्यातील ३६ क्रमांकाचा गाळा मिळालेल्या श्याम लोखंडे यांच्या भाजी विक्री व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून लोखंडे यांना मंडईबाहेर गाळा बांधून देण्यात आला. त्यानंतर लोखंडे यांच्या ताब्यातील गाळा क्रमांक ३६ हा महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने बाबासाहेब खेडकर यांना बहाल केला. त्या प्रकारची नोंद स्थावर मालमत्ता विभागाच्या कागदपत्रात आढळली आहे. या बेकायदेशीर प्रकाराविरोधात भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आवाज उठविला आहे.
मालमत्ता विभागाने गाळा दिलेल्या बाबासाहेब खेडकर याच्यावर महापालिकेच्या तत्कालीन सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर वर्तक नगर पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ३६१/ २०२० नुसार ८ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला १२ दिवसांची कोठडीही ठोठविण्यात आली होती. अशा आरोपी फेरीवाल्यालाच महापालिकेने गाळा दिल्याने स्थावर व मालमत्ता विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावदेवी मार्केट मध्ये १५४ गाळेधारक होते. मात्र, १५५ गाळे बांधले गेले. या मार्केटमधील एक जास्त गाळा हा कोणत्याही रस्ते वा प्रकल्पात बाधित न झालेल्या धर्मेंद्र वाघुले यांना देण्यात आला. सध्या १५५ क्रमांकाचा हा गाळा धर्मेंद्र वाघुलेंच्याच ताब्यत आहे. त्याच्यावर स्थावर व मालमत्ता विभागाने मेहेरनजर का दाखवली, असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे.
काही वर्षांपूर्वी गावदेवी भाजी मंडईलगत असलेल्या एका गाळेधारकाने रस्त्यात ठेवलेला माल महापालिकेच्या उपायुक्ताने जप्त केला होता. त्यावेळी त्या गाळेधारकाने चक्क उपायुक्तालाच धक्काबुक्की केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्या गाळेधारकाचा गाळा असलेले संपूर्ण संकुलच जमीनदोस्त केले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व फेरीवाल्यांची अरेरावी सहन करणार नाही, असा संदेश त्यांनी दिला होता. मात्र, आता सहायक आयुक्ताला दमदाटी करणाऱ्या समाजकंटक फेरीवाल्याला महापालिकेच्या मालकीचा गाळा देण्याचा पराक्रम स्थावर मालमत्ता विभागाने केला आहे, याबद्दल संजय वाघुले यांनी संताप व्यक्त केला.

Read more