राबोडीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटीमार्गावर प्रायोगिक तत्वावर सम विषम पार्किंग

राबोडी वाहतूक उपविभाग हद्दीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटी मार्गावर सम -विषम तारखेला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था प्रायोगिक तत्वावर पुढील 15 दिवस असणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

तत्वज्ञान सिग्नलकडून हाईड पार्क बसस्टॉप सेवा रस्त्यावरील वाहतुकीला मनाई

कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो 4 चे काम चालू आहे. तत्वज्ञान सिग्नल कडून हाईड पार्क बस स्टॉप कडे सेवा रस्त्यालगत मेट्रो चारच्या स्थानकाचे काम करण्यात येणार आहे. या करिता तत्वज्ञान सिग्नलकडून हाईड पार्क बस स्टॉपकडे सेवा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तत्वज्ञान सिग्नल येथे मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेला सुवर्णपदक

मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेनं सुवर्णपदक पटकावले.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती   ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

पैसे घेऊन घरे देण्यास टाळाटाळ करणा-या विकासकांवर होणार कारवाई

सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन इमारतीची एकही वीट न रचता फसवणूक करणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read more

तिर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी 393 कोटी रुपये मंजूर

बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

Read more

ठाण्यातील एक तरूण पत्रकार रविंद्र खर्डीकर यांचं आज दु:खद निधन

ठाण्यातील एक तरूण पत्रकार रविंद्र खर्डीकर यांचं आज दु:खद निधन झालं.

Read more

वॉर रुमच्या माध्यमातून खड्डेमुक्त, कचरामुक्त, स्वच्छता, सौंदर्यीकरण कामांचा दैनंदिन आढावा आयुक्त घेणार

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत खड्डेमुक्त शहर, स्वच्छता, सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी महत्वाकांक्षी कामे सुरू आहेत, या कामांसाठी दोन ते सहा महिन्यांचा मर्यादित कालावधी ठेवण्यात आला आहे. या कालावधीमध्ये ही सर्व कामे पूर्ण करुन नागरिकांना शहरात दृश्यस्वरुपात होणारा बदल घडवून आणणे आव्हानात्मक आहे. शहरात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा दिवसनिहाय आढावा घेणे अपेक्षित असून त्यासाठी वॉर रुम तयार केली जात असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Read more

आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्षानिमित्त जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम पौष्टिक तृणधान्याच्या लागवड क्षेत्र वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी

बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्य चांगले रहावे यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या पौष्टिक तृणधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. तसेच ही पौष्टिक तृणधान्ये आणि त्याचे प्रक्रिया केलेले पदार्थ जनतेला सहजरित्या मिळावेत यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

Read more