उल्हासनगर महापालिकेच्या थकीत देयकांवरील सुमारे ४०० कोटींहून आधीकच्या दंडाची रक्कम उद्योग मंत्र्यांकडून माफ

उल्हासनगर महापालिकेच्या थकीत देयकांवरील सुमारे ४०० कोटींहून आधीकच्या दंडाची रक्कम उद्योग मंत्र्यांनी माफ केली आहे.

Read more

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात

अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील कला महोत्सवांमध्ये गणना होत असलेला अंबरनाथ येथील श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात रंगणार असून दोन भव्य रंगमंचांवर संगीत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तिचे सात कलावंत आपली कला सादर करणार आहेत.

Read more

कोपरीत शिवजयंतीला सेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याचे दुर्लभ चित्र

शिवसेनेतील दुफळी नंतर शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात नेहमीच वादाचे प्रकार घडत आहेत. असे असताना तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीला सेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याचे दुर्लभ चित्र कोपरीत दिसुन आले.

Read more

ठाणे महापालिके तर्फेही शिवजयंती मोठ्या उत्सवाने साजरी

ठाणे महापालिके तर्फेही शिवजयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली. शिवसेनेचा मोठया प्रमाणावर सहभाग असल्याने तिथी नुसार असलेली शिवजयंती मोठया उत्साहात साजरी झाली. ढोल-ताशांचा गजर, झांज पथकांचा कडकडाट, शिवचरित्रावर आधारीत जिवंत देखावे, आकर्षक चित्ररथ आणि लेझीमच्या तालावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठया उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती … Read more

घरगुती पाईप गॅस दरवाढ रद्द करावी – ठाण्यात मागणी

महानगर गॅस ने घरगुती पाईप गॅसच्या दरात वाढ केल्याने नागरिकांनी ठाण्यातील लुईसवाडी येथील महानगर गॅस कार्यालयात धडक देऊन दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे.

Read more

म न से च्या वाटेला गेल्यानचं मुख्यमंत्री पद गेल्याचा राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला

हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षांच्या कृतीत हिेदूत्व दिसत नाही. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं अनेक आंदोलनं केली.

Read more

शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची कामगार आयुक्तांकडे शिफारस

ठाणे शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांची अंतिम यादी आता प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे जाण्याच्या दृष्टीने शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची शिफारस कामगार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.

Read more

आधीच पाण्याचा तुटवडा असताना नवीन हजारो रहिवाशांना पाणी कसे पुरवणार- संजय केळकर

ठाणे शहरात दिवसेंदिवस शहरीकरण होत असल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा गैरफायदा घेऊन टँकर लॉबीने ठाणे शहरात कुत्रिम पाणी टंचाई निर्माण करून विविध सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी घेण्यास भाग पाडण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील घोडबंदर, वागळे इस्टेट, समतानगर, वर्तकनगर, सिध्देश्वर, जेल, तलाव, भागात पाणी पुरवठा होत नसल्याने तेथील सोसायट्यांना नाईलाजास्तव … Read more