जुन्या कोपरी रेल्वे पुलाचे डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे नवीन कोपरी पुलावर वाहनांची वर्दळ

ठाणे पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या कोपरी रेल्वे पुलाचे डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे नवीन कोपरी पुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Read more

गावदेवी मंडईच्या ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन

नौपाडा आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गावदेवी भाजी मंडई भागातील ५०० मिटरपर्यंतचे रस्ते नो पार्किंग झोन करण्याचा तसेच तीन हात नाका ते मल्हार सिनेमा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

भगवान गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ वाहतुकीत बदल

राबोडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत ५ मे  ते ६ मे  रोजी भगवान गौतम बुध्द यांच्या २५६६ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ शिशुज्ञान मंदिर शाळेच्या बाजूस मनोरंजनाचे  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरीकांची गैरसोय होवू नये आणि  परिसरातील वाहतूक सुरळीत, सुनिश्चित होण्याकरीता वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

जुना कोपरी रेल्वे पुल मार्गावर २६ एप्रिल ते २१ मेपर्यंत वाहतुकीत बदल

ठाणे शहरातील जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथील नवीन सब वे व भास्कर कट ते नवीन कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरुवातीस खोदकाम करून डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने  २६ एप्रिल ते  २१ मे पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

Read more

साकेत ते कशेळी मार्गावरील वाहतुकीत ३० एप्रिल ते २ मे पर्यंत बदल

कापूरबावडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत साकेत ते कशेळी मार्गावर ३० एप्रिल ते २ मे पर्यंत साईबाबा मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

Read more

ठाण्यात खाडीपूलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी

मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला खारेगाव आणि साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम कालपासून सुरु झालं आहे. या दुरुस्तीच्या पहिल्या दिवशीच वाहतुकीवर परिणाम जाणवलेला दिसतो.

Read more

दादोजी  कोंडदेव स्टेडियम परिसरातील वाहतुकीत 4 एप्रिल पर्यंत बदल

ठाणे शहरातील  सिडको क्रिक रोड, शितला माता चौक, दादोजी  कोंडदेव स्टेडियम येथील रस्त खचून मलनिसारण होल्स तुटल्याने त्याची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत              4 एप्रिल पर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त एस.एस.बुरसे यांनी कळविली आहे. वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे –         प्रवेश बंद – 1) छत्रपती शिवाजी … Read more

कल्याण-डोंबिवलीमध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी

कल्याण डोंबिवली शहराच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र ही वाहतूक कोंडी बेशिस्त वाहन चालकांमुळे होत असल्याच दिसत आहे.

Read more

मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण

मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ते सुरक्षेसंदर्भात माहिती व्हावी, यासाठी  होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीच्या वतीने प्रशिक्षण आणि परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

मेट्रोच्या कामामुळे 23 ते 26 मार्च दरम्यान कासारवडवली सिग्नलजवळील वाहतुकीत बदल

ठाणे शहरातील कासारवडवली सिग्नल ते घोडबंदर रोड या परिसरात मुंबई मेट्रो लाईन-४ प्रकल्पाअंतर्गत कासारवडवली सिग्नलजवळ मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 23 मार्च 2023 ते 26 मार्च 2023 पर्यंत रात्रौ 23.55 वा. ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत या मार्गावरील ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपाआयुक्त (वाहतूक) डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

Read more