परीक्षेतील मार्क म्हणजेच बुद्धिमत्ता असे नसून सर्व कलेतील कौशल्य ही बुद्धिमत्ताच आहे – आशुतोष शिर्के

बुद्धिमत्ता ठरवण्याचा निकष हा फक्त परीक्षेतील मार्क नसून संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य, फोटोग्राफी, सुसंवाद साधण्याची कला, निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडे, हवामान यांच्या निरीक्षणातून त्यांना समजून घेण्याची कला, विविध भाषा शिकून आत्मसात करण्याचे कौशल्य या सर्व गोष्टी म्हणजे ही बुद्धिमत्ता आहे आणि हे हॉवर्ड गार्डनर या विचारवंताने त्याच्या अनेक वर्षांच्या संशोधनानंतर प्रसिद्ध केलेल्या प्रबंधात सांगितले आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि यूथ मेंटॉर आशुतोष शिर्के यांनी केले.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Read more

वंचितांच्या रंगमंचामधून समाज घडवण्याचं कार्य – विजय केंकरे

अत्यंत यशस्वी लेखक आणि नाटककार म्हणून त्यातच रमून न राहता रत्नाकर मतकरींनी समाजाशी जोडून राहिले. बालनाट्यामधून बाल मनं तयार करण्यापासून लोककथा ७८ सारख्या नाटकातून समाजातील ज्वलंत समस्या लोकांपुढे मांडण्यातून सुरु झालेला त्यांच्या विचारांचा प्रवास वंचितांच्या रंगमंचाने प्रत्यक्ष आकाराला आला. त्यातून माणूस आणि पर्यायाने समाज घडवण्याचे काम त्यांनी सतत केलं आहे. असे उद्गार जेष्ठ दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी विजय केंकरे यांनी समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत मतकरी स्मृती मालेच्या समारोपाच्या सत्रात बोलताना काढले.

Read more

स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केले असल्याने, समाजाने स्त्री – पुरुष समानता आचरणात आणावी

स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे नाव कमवत आहेत. शारिरीक, मानसिक क्षमता असो किंवा शैक्षणिक, व्यवसाय, राजकीय आणि प्रशासनिक आदी जवळ जवळ सर्वच क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व सिध्द केले आहे.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचं आयोजन

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे फेसबुक लाईव्ह मार्फत एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

लोकवस्तीतील एसएससी च्या विद्यार्थ्यांनी लॉकडाउनच्या काळात निराश न होता पुढील शिक्षणाबाबतची पूर्वतयारी करावी. स्वतःची आवड, अभ्यासाची क्षमता आणि घरातल्या आर्थिक परिस्थितीनुसार योग्य अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन विद्यार्थ्यांना फेसबुक लाईव्ह मार्फत करण्यात आले. समता विचार प्रसारक संस्थेने एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत दहावीनंतर काय अर्थात व्यवसाय मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. दहावीनंतरचे कोर्सेस, लवकर रोजगार मिळवून देणारे … Read more

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे रत्नाकरी मतकरी यांना ई-आदरांजली

रत्नाकर मतकरी यांनी कोणत्याही विद्यापीठाची मानस शास्त्रातील पदवी संपादन केलेली नव्हती मात्र माणसातील गंड, विकृती, संवेदना, आकांक्षा, नाते संबंधातील तणाव, अघटितता, आकस्मितता या साऱ्या मनोविकारांचे सखोल भान मतकरींना होते, हे त्यांच्या चतुरस्त्र लिखाणातून जाणवते. अशा शब्दात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेकडून गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत

लॉकडाऊनच्या काळात लोकवस्तींमधील गरजू कुटुंबांना समता विचार प्रसारक संस्थेकडून अन्नधान्याची मदत करण्यात आली.

Read more

नागरिकता कायदा दुरूस्ती अंमलबजावणी प्रकरणात न्याय न मिळाल्यास कागज नही दिखाएंगे सत्याग्रह करण्याचा इशारा

नागरिकता कायदा दुरूस्ती अंमलबजावणी प्रकरणात न्याय मिळाला नाही तर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार नागरिकता दुरूस्ती कायदा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्यानं त्याविरूध्द कागज नही दिखाएंगे हा सत्याग्रह युवक करतील असा इशारा ठाण्यातील युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेचं ईद-दीपावली संमेलन

परिस्थिती कितीही कठीण आणि कठोर असली तरी न डगमगता सत्याची कास धरत तिच्याशी दोन हात करत आपली स्वप्नं पूर्ण करणं हे सर्वांचं ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन घर बचाव, घर बनाव आंदोलनाच्या जमीला बेगम इताकुला यांनी केलं.

Read more