लोकांची जी इच्छा आहे ती शरद पवारांनी पूर्ण करावी – जितेंद्र आव्हाड

शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. सध्या राज्य संस्कृतीहीन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आर्थिक, उद्योग, राजकीय या सर्वच क्षेत्रात नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

Read more

कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन

कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. धनुष्यबाण न घेता भाऊ, पत्नी, भक्त आणि अनुयायांच्या सान्निध्यात रममाण झालेल्या श्री रामाची विविध रूपे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना पाहता आली. या चित्रप्रदर्शनाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

हल्लाबोल महामोर्चात ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार

महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलं आहे.

Read more

शाळेमध्येच शिक्षकांकडून दलित विद्यार्थ्यांचा जातीय छळ – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

वाल्मिकी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जातीय छळ केला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने  रामनगर येथील साधना शाळेमध्ये आंदोलन करण्यात आले.

Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवणा-या गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाळण्याचा प्रयत्न केला.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत राज्य शासनाचा निषेध केला.

Read more

प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो – जितेंद्र आव्हाड

प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो लोकांच्या मनात जावे लागते,धर्मवीर आनंद दिघे असताना देखील या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते आणि त्यांच्या पश्चात जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे त्यांचा वारसा पुढे चालवत असून नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Read more

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने मशाल रॅली

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅली काढण्यात आली. दरम्यान,  यावेळी “गांधी-नेहरूंच्या स्वप्नातील भारत  घडविण्यासाठी नवा लढा उभारण्याची गरज आहे. अन् आम्ही असा भारत घडवू, असा विश्वास  जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ” मशाल रॅली”  काढण्यात आली.

स्वातंत्र्य चळवळीत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जीवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. लाठ्या-काठ्या, तुरुंगवास आणि प्रसंगी गोळ्याही झेलल्या. हुतात्म्यांच्या या समर्पणातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे  या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान, तलावपाळी, ठाणे दरम्यान  “मशाल रॅली” काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाचपाखाडी, आग्रा रोड, राममारूती रोड, साईकृपा हाॅटेल, तलावपाळी असा प्रवास करीत ही रॅली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून जय हिंद,  वंदेमातरम,  भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या.
या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हजारो-लाखो लोकांच्या बलिदानातून आपणाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करायचा असेल तर आपणाला जातीपातील मतभेद दूर करावे लागतील . तरूणांना अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी आपणाला लढा उभारावा लागेल.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 3 हजार छत्र्यांचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपट येथील हंस नगर परिसरात सुमारे 3 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

Read more