कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो 4 चे काम चालू आहे. सदर मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे कडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतूकीस बदल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल
ठाणे महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या मेट्रो ४ च्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. मानपाडा ते कासारवडवली दरम्यान गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे ते घोडबंदर वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी १५ मे ते २7 मे या दरम्यान रात्रौ २३.५५ वा. ते सकाळी ०५.०० … Read more