वादग्रस्त प्रभाग रचनेच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा महापौरांचा इशारा

ठाणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करताना माझी राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी नुकताच केला आहे. तसेच, पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेला मूळ आराखडा जाहीर करण्याची मागणीही आव्हाड यांनी केली आहे. मग हा मूळ गोपनीय आराखडा आव्हाड यांनी पाहिला आणि तो बदलण्यास भाग पाडले, असा अर्थ घ्यायचा का, असा गंभीर आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Read more

तर महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी अशक्य

खारेगांव पूलावरून सुरू असलेली श्रेयवादाची लढाई आमच्या दृष्टीनं आम्ही थांबवली आहे. मात्र या विषयावर टीका टिप्पणी होत राहिल्यास आघाडी करणं अवघड आहे असं वैयक्तीक मत महापौर नरेश म्हस्के यांनी आज व्यक्त केलं.

Read more

ठाण्यात होणारा मराठी गजल मुशायरा कार्यक्रम तूर्तास रद्द

ठाण्यात १५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला गजल मुशायरा कार्यक्रम ओमिक्रॉन व्हेरियंट आणि कोव्हीडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तूर्तास रद्द करण्यात आला आहे.

Read more

बूस्टर डोस देण्याबाबत महापालिकेची तयारी सुरू

येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुले, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत.

Read more

आगीमुळे बेघर झालेल्यांना महापौरांतर्फे रेंटल हौसिंगमध्ये निवारा

नौपाडा येथील मल्हार सिनेमाजवळील पार्वती निवास येथील दुमजली इमारतीला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत बेघर झालेल्या दोन कुटुंबाना महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या रेंटल स्कीममधील घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

Read more

शाळेच्या पहिल्या दिवशी महापौरांनी गुलाबपुष्प देवून केले विद्यार्थ्यांचे स्वागत

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड आणि ओमिक्रॉन विषाणू नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून आज महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या किसननगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

Read more

बीएसयूपी योजनेतंर्गत 158 दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बीएसयूपी योजनेतंर्गत महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते 158 दिव्यांग बांधवांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

Read more

ठाणे पूर्व सॅटिस-2 प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यत पूर्ण होणार – महापौर

ठाण्याच्या पूर्व भागात उभारला जात असलेला सॅटीस-२ हा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत खुला होईल अशी अपेक्षा महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

Read more

विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापौरांनी घेतला नागरिकशास्त्राचा धडा

करोना म्हणजे काय? तो कशामुळे होतो. करोनापासून दूर राहण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, तसेच नागरिकांची कर्तव्ये कोणती? नगरसेवक म्हणजे काय, महानगरपालिकेची रचना कशी असते? नागरिकांची कर्तव्ये आणि अधिकार कोणते? शहराचा महापौर कसा निवडून येतो, असे प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका शाळा क्र. 23 मधील आठवीच्या वर्गात नागरिकशास्त्राचा धडा घेतला.

Read more

शाळेच्या घंटेचा नाद हा ब्रम्हांडातील नादाशी नाळ जोडणारा – महापौर

शाळेची घंटा आणि तिचा नाद हा ब्रह्मांडातील नादाशी नाळ जोडणारा असतो, तसेच शाळेतील घंटेचा नाद आणि मंदिरातील शंखनाद यात समान ताकद असते. विद्यार्थी दशेपासून कुतुहल म्हणून हात लावावीशी वाटणारी घंटा आपल्याच शाळेच्या नव्या वास्तूत दीड वर्षांनी पहिला तास संपल्यावर जेव्हा आपल्या हस्ते वाजली तो क्षण हा आजपर्यतच्या प्रवासातील सर्वोच्च क्षण असल्याचे भाग्य अनुभवले. विद्यार्थी ते ठाणे शहराचा प्रथम नागरिक या वाटचालीत सरस्वती मंदिर या शाळेचा महत्वाचा वाटा असल्याचे उद्गगार सरस्वती शाळेचे माजी विद्यार्थी आणि महापौर नरेश म्हस्के यांनी काढले.

Read more