ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरास स्पर्धेत शिवगर्जना मित्र मंडळास प्रथम क्रमांक

ठाणे महापालिकेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत उथळसरमधील शिवगर्जना मित्र मंडळाच्या हस्तकला आणि ओरेगामी कलेपासून सजावटीला प्रथम क्रमांक पटकाविला.

Read more

कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम क्रमाकांचे विजेते

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली श्री गणेश दर्शन स्पर्धेच्या परंपरेचा वसा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवला आहे. यंदा घेण्यात आलेल्या शिवसेना ठाणे जिल्हा गणेश स्पर्धेत ‘पृथ्वी रक्षण आणि जीवन’ या विषयावर देखावा साकारलेल्या कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी जाहीर केले.

Read more

महाराष्ट्र स्पोर्टस क्लब संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं गणेशोत्सवाचं ५०वं वर्ष

मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी सणावाराची जी मूळ संकल्पना होती; ती फारच दूर गेली आहे. लोकांना मनोरंजनाची साधने आपल्या हातात मिळाली आहेत. तरीही, जनजागृती, स्थानिकांच्या कलागुणांना वाव देणे अन् लोकांना एकत्र आणण्याची जी मूळ संकल्पना होती त्या संकल्पनेला अनुसरुन उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्टस क्लब संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेली 50 वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव मंडळाची 1973 मध्ये जनार्दन वैती यांनी काही तरुणांच्या साथीने स्थापना केली होती.

Read more

ठाणे महापालिकेचा गणेशोत्सव अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहात साजरा – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका कर्मचारी श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सपत्नीक सत्यनारायणाची महापूजा केली.

Read more

जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतीची तर दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना

यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतीची तर दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.

Read more

राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकीने उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी 30 ऑगस्टपूर्वी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ऑनलाइन अर्ज पाठवावेत, असे आवाहन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

Read more

ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

Read more

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा

विश्वातील सर्वात मोठा गणेशोत्सव सोहळा राज्यात साजरा होतो. राज्याचा पर्यटन विभाग आणि ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन महामंडळाने संयुक्तपणे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या औचित्याने गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे.

Read more

गणेश मूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगचा लाभ घेण्याचे आवाहन

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिकेच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंदाही ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजना राबविण्यात येत आहे. या ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगची कर्मचाऱ्यांकरिता कार्यशाळा झाली. यंदाही नागरिकांनी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

महापालिका शाळेत शाडू माती पासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष, शिक्षण विभाग आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळा तसेच इतर शाळांमध्ये शाडू माती पासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा झाली.

Read more