महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिम्मित शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.  
समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे, स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खोपट येथील भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्यालयात आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा तर्फे अध्यक्ष सचिन केदारी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले, ओबीसी महिला संयोजक वनिता लोंढे,माजी गटनेते मनोहर डुंबरे,माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी,भाजपा ओबीसी मोर्चा,ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सचिन केदारी,महिला अध्यक्षा नयना भोईर,कैलास म्हात्रे,मनोहर सुगदरे, आदीसह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सुमारे २७  सत्कारमूर्तीं चा सन्मान करण्यात आला.
 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस बाबुराव रामण्णा, सचिव महेश सुभाष सपकाळे, उपाध्यक्ष नागेश भोसले, नरेश ठाकुर, सुनील बांगर, बळीराम भोडोकार, अविनाश गावंडे , महिला सरचिटणीस श्रृतिका कोळी मोरेकर ,कल्याणी सुर्वे,कल्याणी वाघमारे,हर्षला म्हात्रे,चित्रा मिरवणकर,रेणुका निकम,रायला देवी मंडळ  वरून कारंजे,लाभेश धसाडे,रायला देवी मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र भऊर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव श्री महेश सुभाष सपकाळे यांनी केले.

Read more

भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त जनसंघापासून कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

भाजपाचा ४३ वा स्थापनादिन ठाणे शहरात आज उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात भाजपाकडून तीव्र आंदोलन

ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.

Read more

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार आंदोलन

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आलं.

Read more

प्रशांत जाधव हल्ल्याचा तपास क्राईम ब्रॅंचकडे देण्याची भाजपाची मागणी

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याबाबत आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

Read more

ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला मारहाण

ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

जिल्ह्यातील ११ हजार शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार वेळेवर होणार

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेतरांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी शासनाने अखेर ७१ कोटींची तरतूद केल्याने ११ हजार शिक्षकांचे पगार वेळेवर होणार असून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याच्या यश आले आहे.

Read more

भंडार्लीसाठी जागा घेतल्यानंतरही दिव्यात डंपिंग ग्राऊंड सुरूच – भाजपातर्फे तीव्र आंदोलन

भंडार्ली येथे डंपिंगसाठी तीन लाख ६५ हजार चौरस फूट जागा घेतल्यानंतरही, दिव्यात डंपिंग ग्राऊंड बंद करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याबद्दल, भाजपाच्या वतीने दिवा डंपिंग ग्राऊंडवर तीव्र आंदोलन करण्यात आले.

Read more

चेंदणी कोळीवाडा येथे सॅटीस ३ प्रकल्प उभारण्याची मागणी भारतीय जनता पक्षाची मागणी

चेंदणी कोळीवाडा येथे सॅटीस ३ प्रकल्प उभारण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या संदीप लेले यांनी केली आहे.

Read more

कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन

आमदार संजय केळकर आणि भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

Read more