जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वीज वितरण सेवा सुदृढ करणार – संजय केळकर

वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत असून त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली.

Read more

गौरी-गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकण रेल्वेची विशेष गाडी सोडण्याची संजय केळकरांची मागणी

गणेशोत्सवासाठी २९ ऑगस्ट रोजी दिवा ते सावंतवाडी विशेष गणपती स्पेशल जादा गाडी सोडण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

Read more

घोडबंदर तसंच अन्य भागासाठी ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

बारवी धरणातून घोडबंदर तसेच अन्य भागासाठी ५० दशलक्ष लिटर पाणी मिळावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

गावदेवी येथील सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे हक्काची घरे

गावदेवी येथील सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 28 वर्षांनी हक्काची घरे मिळाली.

Read more

पोलीस वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारती कात टाकणार

ठाण्याच्या पोलीस वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारती लवकरच कात टाकणार आहेत.

Read more

घरेलू कामगारांच्या न्यायासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमदार संजय केळकरांची ग्वाही

राज्यात हजारो गोरगरीब, काबाडकष्ट करणारे घरेलू महिला कामगार गेले अनेक वर्ष हक्काचे वेतन, सेवा सुरक्षितता आणि पेन्शनसाठी शासन दरबारी मोर्चा आंदोलने, उपोषणाव्दारे मागणी करीत असून त्यांना अद्यापी न्याय मिळाला नाही. आता यापुढे शासनाविरुद्ध एल्गार पुकारून घरेलू कामगारांना संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून लढू अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली.

Read more

शहर विकास विभागातील त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची संजय केळकरांची मागणी

शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, परंतु काही बिल्डरांना नाहक त्रास दिला जातो, हे नुकत्याच अटक केलेल्या ब्लॅकमेलरच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात शहर विकास खात्यातील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

बाळकुम जवळील रस्ता खुला करणार

ठाणे नाशिक हायवेवर साकेत जवळ सुरु असलेल्या हायवे रुंदीकरणाच्या कामामुळे साकेत, रुस्तमजी, राबोडी येथील वाहनधारकाना परतीला मोठा वळसा पडत होता. त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी हायवे अथॉरटिच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत पहाणी दौरा केला.

Read more

पोलीस इमारतींची तातडीने दुरुस्ती करा – संजय केळकर

ठाणे शहरातील पोलीस वसाहतींच्या इमारतींची परिस्थिती गंभीर झाली आहे. तातडीने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी शासनाकडे केली. आमदार संजय केळकर यांनी आज नवीन पोलीस वसाहत क्र. १ ते ६ तसेच इमारत ए, बी, सी या इमारतींची पाहणी करून पोलीस कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, आदी उपस्थित होते. … Read more

सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आश्वासन

राज्यातील सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि गतिमान कामकाज करण्यासाठी योग्य त्या सुधारणा करण्याचं आश्वासन धर्मादाय आयुक्तांनी दिलं आहे.

Read more