लंपी आजारापासून जनावरांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात पर्याप्त लसी उपलब्ध

जिल्ह्यात लंपी त्वचारोगाची संशयित जनावरे आढळली असून आतापर्यंत 14 जनावरं बाधित असल्याचे दिसून आले आहे. या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी राज्य शासनाकडून पर्याप्त लस उपलब्ध झालेली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून दहा हजार लसीची मागणी केली आहे. लंपी आजाराशी लढा देण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी सांगितले आहे.

Read more

ठाण्यात येत्या रविवारी पल्स पोलिओ मोहिम

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने रविवार दिनांक 18 सप्टेंबर, २०२2 रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.  या मोहिमेतंर्गत नागरिकांनी ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा  आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले आहे.

Read more

रायपूर येथे झालेल्या ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंची बाजी

रायपूर येथे झालेल्या 33 व्या पश्चिम विभागीय ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंनी बाजी मारली आहे.

Read more

अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. आज कोरोनाविषयक कोणतेही निर्बंध नसल्यामुळे गणेश भक्तांनी अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र गणेश मंदिरांमधून दिसत होतं.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ९० टक्के पाऊस

ठाण्यामध्ये गेले काही दिवस पाऊस कोसळत असला तरी गेल्यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी अवघा ९० टक्के पाऊस झाला आहे.

Read more

जिल्ह्यात पुढील ५ दिवस जोरदार ते अति जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज – गुरूवारी तर ऑरेंज अलर्ट

वेधशाळेनं जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.

Read more

फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी ठाणेकर वेद दुसा या जलतरणपटूंची निवड

ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

Read more

ठाण्यातील हरित पथावर मेलेल्या कुत्र्यामुळे काही काळ गोंधळ

ठाण्यातील हरित पथावर आज एका मेलेल्या कुत्र्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

Read more

कोलबाड सार्वजनिक मंडळाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू

कोलबाड येथे कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या शेडवर अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी सुटणाऱ्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे धोकादायक झालेले पिंपळाचे झाड कोसळून अर्पिता वालावलकर  या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला असून तिच्यासोबत प्रतिक वालावलकर(वय ३०), सुहासिनी कोलुंगडे (वय ५६), किविन्स परेरा (वय ४०) दत्ता जावळे (वय ५०) कु. चईत राघवेंद्र राव (वय १७) हे किरकोळ जखमी असून चुवारी केदार कनोजिया (वय ५५) व लालचंद गौंड (वय ६६) हे जखमी झाले असुन त्यांच्यावर वेलनेस हॉस्पिटल, कोलबाड येथे उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Read more

नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा ०१ आणि ०२ ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार

महाविद्यालयीन विश्वात मानाची असलेली कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा ०१ आणि ०२ ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार आहे.

Read more