विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम – सर्व केंद्रात सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरू राहणार

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम ही लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या मोहिमेस 7 ऑगस्टपासून सुरूवात झाली असून दिनांक 12 ऑगस्टपर्यत ही मोहिम महापालिकेच्या सर्व केंद्रात सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरू राहणार आहे. आरोग्य 

Read more

कल्याणमध्ये हजारोंच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

योग हा मन आणि शरीर सुदृढ करण्याचा मार्ग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे केले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय पंचायती राज मंत्रालय आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने कल्याणमधील फडके मैदानात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Read more

जव्हेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालयातर्फे कर्णबधीरांसाठी उद्या कान तपासणी शिबीराचं आयोजन

जव्हेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालयातर्फे कर्णबधीरांसाठी उद्या कान तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ज्युपिटर हॉस्पिटलचे गेल्या ६ महिन्यांत तिसरे यशस्वी हृदय प्रत्यारोपण

४३ वर्षीय नसरीन राऊत यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल येथे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

Read more

आशा कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीने जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम संपन्न

डॉ. कामत यांच्या आशा कॅन्सर हॉस्पिटल आणि ट्रस्टच्या वतीने महिला दिन आणि जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 100 हून अधिक महिला आणि कर्करोगग्रस्तांनी सहभाग घेतला.  

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समृद्धी महामार्गाच्या प्रभारी उपजिल्हाधिकारी सौ. रेवती गायकर, लोकमतच्या प्रज्ञा म्हात्रे, एमएसईबी अधिकारी (जवाहर बाग) अमिता सणसे, रिक्षाचालक विनीता मिलिंद यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी पुरुष वर्चस्व असलेल्या व्यवसायातील त्यांच्या जीवनातील अनुभवांबद्दल आणि त्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी कशी केली याबद्दल अनुभव सांगितले. योग्य महिला स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहांच्या अभावाच्या नित्याच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याचे आभार मानले ज्यामुळे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले.
या कार्यक्रमामध्ये आशा कॅन्सर ट्रस्ट आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱयांनी खेळ, गाणी आणि इतर मनोरंजन कार्यक्रमांची सुंदर व्यवस्था केली होती. सर्वांना योग्य आहार व्यायाम आणि स्वतच्या शरीराची जाणीव करून स्वतची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमितपणे स्तनाची स्वत: तपासणी आणि 45 वर्षांनंतर मॅमोग्राफी करण्याची सूचना करण्यात आली. किडनी कॅन्सर सर्व्हायव्हर निलेश वेदक यांचे गायन मधुर होते. भूमी मयेकर आणि शुभ्रा यांचा डान्स चित्तथरारक आणि उत्साही होता. आशा कॅन्सर हॉस्पिटलचे कर्मचारी आणि मुलांनी पहिल्यांदा बॉलीवूड रेट्रोथीमवर रॅम्प वॉक केला. व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी खरोखर चांगले प्रदर्शन केले. सर्वांचे आभार मानून आणि चहा-नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. पाहुण्यांना फुलांची रोपटी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” योजनेच्या विस्ताराची घोषणा

राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालयाची सुवीधा

एखादा व्यक्ती आजारी पडला तर रुग्णांसहीत नातेवाईकांची तारांबळ उडते. मानसिक ताणतणाव वाढतो, अशावेळी रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून आयुक्त अभिजीत बांगर यांनी नव्या मित्राची साथसंगत देण्याची योजना आखली आहे.

Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या समस्यांचे निराकरण – जेष्ठांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या समस्यांचे निराकरण आता होणार आहे. जेष्ठांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून याद्वारे जेष्ठांच्या तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे.

Read more

वीजेअभावी ठाण्यातील ५ आपला दवाखाना बंद

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने ठिकठिकाणी आपला दवाखाना सुरु केले मात्र शहरातील पाच दवाखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Read more