स्मार्ट सिटी योजनेच्या सर्वेक्षणात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं महापालिकेचं आवाहन

शहर नियोजनाचे धोरण ठरविताना त्यात नागरिकांचा सहभाग कसा वाढविता येईल, यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचे काम केंद्र सरकार स्मार्ट सिटी योजनेतंर्गत करीत आहे. यासाठी देशातील सर्व 100 स्मार्ट सिटी शहरांमध्ये अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022 या कार्यक्रमातंर्गत नागरिक आकलन सर्वेक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सर्व प्रभागसमिती स्तरावरुन जाहिरात, पथनाट्य आदीच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचना ठाणे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

Read more

शासकीय कार्यालये तसंच शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याची कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त घोषित करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

Read more

शहर विद्रुपीकरण प्रकरणी दोन नागरिकांवर पालिका आयुक्तांकडून कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जन्म दाखल्यासाठी पैसे मागणे या सारख्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे शहराची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.

Read more

रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम महापालिका करणार आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान तलावा जवळ एकही कामगार हजर नसल्याने पालिका आयुक्तांनी कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.

Read more

संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हीरक महोत्सवी मित्र मेळावा

जलद गोलंदाजीप्रमाणे फिरकी विशेषतः लेगब्रेक गोलंदाज हे फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हुकमी एक्का असायचा. या अनुभवाचा फायदा युवा क्रिकेटपटूंना देऊन दर्जेदार लेगब्रेक घडवण्याचा संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या हीरक महोत्सवी मित्र मेळाव्यात करण्यात आला.

Read more

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

जिल्ह्यातील मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Read more

जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी जाहीर; शंभर टक्के छायाचित्रांचा समावेश – जिल्हाधिकारी

भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिका-यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील मतदारांची एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकूण 61 लाख 34 हजार 955 झाली असून यादीत शंभर टक्के मतदारांची छायाचित्रे असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

Read more

गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्के जास्त पाणीपट्टी वसुली

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपट्टी वसुली मोहिम व्यापक प्रमाणात सुरू असून १ एप्रिल ते ८ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ५१ कोटी २१ लाख ८८ हजार इतकी वसुली झाली आहे.

Read more

चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींची ठिकठिकाणी गर्दी

वर्षाच्या अखेरीस आलेलं चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

Read more