नौपाडा पोलीस स्टेशन गणपतीचं घोडागडीतून विसर्जन

ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या 16 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी त्यांचे 17 वे वर्ष आहे.

Read more

ठाण्यात दोन दिवस पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यामध्ये गेली दोन दिवस पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे सर्वसामान्य ठाणेकरांची त्रेधातिरपिट उडाली आहे. काल आणि आज सकाळी ऊन पडलं होतं मात्र संध्याकाळ नंतर जोरदार पाऊस झाला. ढगाच्या कडकडाटासह विजेच्या चमचमाटात हा पाऊस झाला. साधारणता साडेचार नंतर सुरू झालेल्या या पावसाने अनेकांची भंबेरी उडवली. दुपारी साडेचार पासून सुरू झालेल्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे … Read more

प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यांच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर पेच

गणरायाच्या विसर्जनाला काही तास उरलेले असताना प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यांच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर पेच उभा राहिला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने, केंद्रीय प्रदूषण मंडळाची विसर्जन नियमावली – २०२० मधील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही ठामपा याबाबतीत काय कार्यवाही करते याकडे लक्ष ठेऊन दोन आठवड्यात अनुपालन … Read more

टेंभीनाक्या वरील नवरात्र उत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेल्या जय अंबे मा ट्रस्टच्या नवरात्र उत्सव मंडपाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडत आहे .मागील ४७ वर्षांपासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यंदाही हा नवरात्र उत्सव मोठा धुमधडाक्यात पार पडणार असून यंदाचा देखावा आयोध्या नगरीतील राम मंदिराची प्रतिकृती असणार … Read more

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान मंगळवारी इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान मंगळवारी इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव काल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले..त्यांच्याहस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या हाताने बाल गोपाळांना मोदक भरवले आणि त्यांचा सहकुटुंब शाही पाहुणचार केला. चिमुरड्यांनी केलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात वर्षावरील वातावरण भारावून गेले. मंगळवारी … Read more

कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीची तयारी सुरू

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील जास्तीत पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा तसेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या वाढावी, यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी … Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशी प्रकरणात कोणावरही ठपका नाही

ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने अखेर आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण तापले असताना या अहवालात मात्र कोणावरही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी मृत्यूचे तांडव होऊन एकावरही दोषारोप ठेवण्यात … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांबाबत चंगळ

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळालेल्या सुट्ट्यांमुळे त्यांची मोठी चंगळ झाली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना आता सलग पाच दिवस सुट्टी मिळाली आहे उद्या गणेश विसर्जनाची शुक्रवारी इदची शनिवारी चौथ्या शनिवारची रविवारी रविवारची सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी जाहीर झाली आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळच झाली आहे

इद ए मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात … Read more

गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

Read more