जिल्ह्यातील एचआयव्ही पॉझिटिव्हीटी रेट कमी

राष्ट्रीय एड्स नियंत्रण महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मातेकडून बालकांना होणारे एचआयव्ही संक्रमण निर्मूलन समिती बैठकीचा आढावा शिनगारे यांनी घेतला.

Read more

घोडबंदर रोडवरील वाहतूकीत  बदल

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात में जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लि. कंपनी कडून मुंबई मेट्रो लाईन-४ चे कासारवडवली ते गायमुख पर्यंत काम चालू असून मेट्रो-४ चे पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने 3 डिसेंबर पर्यंत  वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयूक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

रेल्वेवर दगडफेक, आरोग्य केंद्र संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याचे रेल्वेचे आश्वासन

दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे आरोग्य केंद्र तसेच रेल्वेवर दगडफेक संदर्भात मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

Read more

जानेवारीत होणार बंजारा समाजाचे महाकुंभ – ठाण्यात आज पोस्टर प्रकाशन

जानेवारीमध्ये होणा-या अखिल भारतीय हिंदू बंजारा-लबाना नायकडा महाकुंभामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी केले.

Read more

ठाण्यातील शाळांमध्ये संविधानाविषयी मार्गदर्शन

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालय, ठाणे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने संविधान दिवसाच्या निमित्त २५ नोव्हेबर रोजी ठाणे शहरातील चार शाळेमध्ये एकाच वेळी संविधानात दिलेली उद्देशिका, मुलभुत हक्क, मुलभुत कर्तव्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Read more

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स यांच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून प्रशिक्षणार्थींनी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे.

Read more

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, प्रभातफेरी यासह विविध कार्यक्रमाने जिल्ह्यात संविधान दिन साजरा

संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध आश्रमशाळा, वसतिगृहात संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले.

Read more

गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा – महापालिका आयुक्त

गोवर या आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सातही दिवस ओपीडी सुरू ठेवा. मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी लसीकरणाची मोहिम हाती घेवून ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा, तसेच आरोग्य केंद्रात उपचार दिले जात आहेत असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करा अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. मुंब्रा परिसरातील गोवर आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त श्री. बांगर यांनी कौसा रुग्णालय येथे बैठक घेतली.

Read more

ठामपाच्या सुरक्षा विभागाने रक्तदान करुन 26/11मधील शहिदांना वाहिली आदरांजली

ठाणे महापालिकेच्या सुरक्षा विभागातर्फे संविधान दिनानिमित्त 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करुन आदरांजली अर्पण केली.

Read more

गटई कामगारांनी केला संविधानाचा जागर

संविधान दिनाचे औचित्य साधून गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more