भारतमातेच्या आरतीसह निवृत्त सैनिकांकडून उत्स्फूर्त रॅली

भाजपा, अर्पण फाऊंडेशन यांच्यावतीने भारतमातेची महाआरती, सामुहिक राष्ट्रगान, सायकल रॅली, ज्येष्ठ व माजी सैनिकांच्या रॅलीसह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे व अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रह्मांड, कोलशेत परिसरात `हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. त्याचबरोबर विविध कार्यक्रम करण्यात आले. त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. पारंपरिक नऊ वारी साडीमध्ये ७५ महिलांकडून भारतमातेची आरती, सायकल रॅली, ज्येष्ठ नागरिक व निवृत्त सैनिकांची रॅली काढण्यात आली. तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

Read more

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता आणि अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read more

जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वीज वितरण सेवा सुदृढ करणार – संजय केळकर

वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत असून त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली.

Read more

गौरी-गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकण रेल्वेची विशेष गाडी सोडण्याची संजय केळकरांची मागणी

गणेशोत्सवासाठी २९ ऑगस्ट रोजी दिवा ते सावंतवाडी विशेष गणपती स्पेशल जादा गाडी सोडण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

Read more

भाजप राज्यपालांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही – आशिष शेलार

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्ष अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.

Read more

रेल्वे स्थानक स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम

ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागाचे फेरीवाल्यांनी चक्क गोदामात रुपांतर केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

घोडबंदर तसंच अन्य भागासाठी ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

बारवी धरणातून घोडबंदर तसेच अन्य भागासाठी ५० दशलक्ष लिटर पाणी मिळावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

बारवी धरण प्रकल्पग्रस्तातील सर्वांना १५ ऑगस्टपासून नोकरीत सामावून घेण्याचे कपिल पाटलांचे आदेश

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या मुहूर्तावर १५ ऑगस्ट रोजी बारवी धरणातील सर्वच्या सर्व ४१८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे, असे आदेश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले आहेत.

Read more

मुरबाड रेल्वेसाठी वेगवान निर्णय – केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देणारे पत्र राज्य सरकारने आज तत्काळ रेल्वे बोर्डाला पाठविले.

Read more