आमच्या विषयी

ठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली २८ वर्ष नियमितप्रसारीत होणारं पहिलं आणि एकमेवइलेक्ट्रॉनिकदृकश्राव्य माध्यम आहे. १ एप्रिल १९९५ मध्ये ठाणेवार्ताची सुरूवात झाली. सुरूवातीला साप्ताहिक स्वरूपात प्रक्षेपित होत असलेलं ठाणे वार्ताकालांतराने रोज आणि आता दर तीन तासांनी प्रक्षेपित होत आहे.

ठाणे वार्तानं अनेक उपक्रम सर्वप्रथम राबवले.ठाण्यातून थेट कल्याण, डोंबिवलीच नव्हे तर इतरभागाबरोबरच थेट पुण्यात प्रक्षेपण केलं. ठाणे वार्तानं आता कुठलाही कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्याचा हातखंडा प्राप्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून पाचव्या-सहाव्या मार्गिकेचं केलेले लोकार्पण, ठाणे जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता सोहळा, उरी बालाकोट प्रतिहल्ल्यातील प्रमुख लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, रामनवमीचा खासदार राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे यांचा कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रीमंडळ विस्तार अशा अनेक कार्यक्रमांचं अलिकडेच थेट प्रक्षेपण केलं आहे. आता आम्ही ठाण्यातील कोणताही कार्यक्रम थेट प्रक्षेपित करू शकतो.

हठयोगी निकम गुरूजींचं ‘योग वार्ता’, छोट्या छोट्याआजारांवर घरगुती उपायांवर मार्गदर्शन करणारं‘आरोग्य वार्ता’, घरातील नेहमीच्या गोष्टींमधून सौंदर्यवाढवण्याचा सल्ला देणारं ‘सौंदर्यवार्ता’, अगदीसामान्य महिलेच्या घरातील असामान्य मेजवानीम्हणजे पाककृतीवर आधारीत ‘मेजवानी’ हा कार्यक्रम,नवनवीन पुस्तकांचा परिचय करून देणारं ‘वाड्‍़मयवार्ता’, ‘तयारी दहावीची’ हा शैक्षणिक मार्गदर्शन करणारा कार्यक्रम, ‘क्रांतीचा वडवानल’ हा १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यापासून १९७१ पर्यंतच्या पाकिस्तानयुध्दापर्यंत देशासाठी बलिदान देणा-या वीरांचीओळख करून देणारा कार्यक्रम, घरबसल्या आपल्यासमस्यांची तड लावणारा ‘नमस्कार मंडळी’ हा थेटप्रक्षेपित होणारा फोन-ईन कार्यक्रम, आठवडाभरातीलसांस्कृतिक घडामोडींचा परिचय करून देणारा‘सांस्कृतिक मेजवानी’, लावण्याविषयी मंत्र देणारा‘लावण्यमंत्र’, घरबसल्या गाण्याची संधी देणाराअनोखा कार्यक्रम ‘दम असेल तर गा’, गुजरातीबातम्या तसंच दर २ तासांनी पुण्यातील बातम्याठाण्यातून प्रक्षेपित करणारा ‘पुणे न्यूज’ हे दृकश्राव्यबातमीपत्र, आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या इंग्रजीबातम्या असा ठाणे वार्ताचा आलेख आहे. आता तरठाणे वार्तानं “श्रीस्थानक” ही वाहिनी सुरू केलीअसून ही जिल्ह्यातील पहिली स्थानिक वाहिनी आहे.आता घरबसल्या लुटा आनंद या ब्रीकवाक्यानुसारठाणेकरांना गेली ५ वर्ष ठाण्यात घडणारे कार्यक्रमकधी थेट तर कधी ध्वनीचित्रमुद्रित पध्दतीनं दाखवतआहेत. आता नजिकच्या काळात अगदी छोटे छोटेकार्यक्रमही थेट पाहण्याचा आनंद ठाणेकरांना लुटतायेणार आहे.