तुळशीधाम लोकउपवन येथे भरधाव रिक्षा नियंत्रण सुटल्याने टेंपोला धडकल्यानं अपघात

तुळशीधाम लोकउपवन येथे काल भरदुपारी एक भरधाव रिक्षा नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या टेंपोला धडकल्याची दुर्घटना घडली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. तर रिक्षाचालक मस्तराम वर्मा याच्या डोक्याला मार लागुन तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्मा हा रुग्ण घेवुन कोपरी येथुन रिक्षाने परतत होता. तर धडक बसलेला टेंपो अरूण वाघ यांच्या मालकीचा असुन अत्यावश्यक सेवेसाठी जल वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडुन देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading