खोपटमधील एका जेष्ठ नागरिकाची सुमारे ८ लाखांची ऑनलाईन फसवणूक

खोपटमधील एका जेष्ठ नागरिकाची सुमारे ८ लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोपटमध्ये राहणा-या या व्यावसायिकाला १५ एप्रिलला मोबाईलवर राहूल मिश्रा या अनोळखी व्यक्तीने फोन केला आणि तुमचे पेटीएम बंद झाले असून तुमची नवीन केवायसी करावी लागेल असं त्याने सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या जेष्ठ नागरिकाने एक नविन अॅप आणि कॅनरा बँकेचे मोबाईल अॅप चालू केले. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्याने त्यांचे पेटीएम आणि कॅनरा बँकेच्या एनईएफटीद्वारे ७ लाख ९९ हजार ९९७ रुपयांची रक्कम अन्य बँक खात्यामध्ये वळती केली. या जेष्ठ नागरिकाने नंतर बँकेशी संपर्क साधला असता बँकेने अशी कोणतीही केवायसी नूतनीकरणासाठी विचारणा केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading