TMC

वृक्षाधिकारी केदार पाटील यांना तात्काळ वृक्षाधिकारी पदावरून हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ठाण्याचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांना तात्काळ वृक्षाधिकारी पदावरून हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. मतदाता जागरण अभियानाचे कार्यकर्ते रोहित जोशी यांनी बेकायदेशीरपणे स्थापन झालेले वृक्ष प्राधिकरण बरखास्त करावे आणि आयुक्तांना २५ झाडे तोडण्याचे परवानगी देणारे अधिकार काढून घ्यावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणीच्या दरम्यान वृक्ष प्राधिकरणाचे पुनर्गठन करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्याचप्रमाणे नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना केदार पाटील यांच्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल झालेल्या सुनावणी दरम्यान नगरविकास खात्याने केदार पाटील यांच्या वृक्षअधिकारी या नेमणुकीबाबत सादर केलेल्या अहवालात प्रतिकुल टिप्पणी केल्यानं उच्च न्यायालयानं ही नेमणूक नियमबाह्य ठरवत केदार पाटील यांना तात्काळ वृक्ष अधिकारी पदावरून हटवण्याचे आदेश महापालिकेला दिले. सहाय्यक आयुक्त पदावरील अधिका-याला पुढील एक महिन्याच्या आत वृक्ष अधिकारी म्हणून नेमावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *