education zp

आरटीई च्या दुस-या फेरीत २ हजार ६३७ अर्जांची निवड

आरटीईच्या दुस-या फेरीत २ हजार ६३७ अर्जांची निवड झाली आहे. वंचित तसंच दुर्बल गटातील बालकांना पहिली ते आठवीचं शिक्षण विनामूल्य मिळावं यासाठी शासनानं या घटकातील बालकांकरिता पहिलीच्या मंजूर जागांपैकी २५ टक्के प्रवेश हे संबंधित शाळांनी आपापल्या स्तरावर करायचे आहेत. ठाणे जिल्ह्यातील ५ तालुके आणि महापालिकेतील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी दुस-या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली. दुस-या फेरीत प्ले ग्रुपसाठी ५, प्री केजीसाठी ५१७, ज्युनियर केजीसाठी ५९२ आणि इतर तसंच पहिलीसाठी १ हजार ५२३ अर्जांची निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *