कोव्हीड-19 शी सामना करण्यासाठी 12 खासगी वैदयकीय व्यावसायिकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती

कोव्हीड-19 साथ रोगाच्या परिस्थितीशी प्रभावीपणे सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी 12 खासगी वैदयकीय व्यावसायिकांची तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर डॅा. शैलजा पिल्लई यांची ॲान कॅाल तज्ज्ञ डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नियुक्ती जून 2020 पर्यंत अथवा कोव्हीड-19 ची साथ संपेपर्यंत करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधीत रूग्णांना दाखल करण्यासाठी सफायर हॅास्पीटल, हॅाटेल लेरिडा, हॅाटेल जिंजर या दोन हॅाटेलसह भायंदरपाडा येथील डी बिल्डींग व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी रूग्णांना डॅाक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी वैद्यकिय अधिकाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेवून पालिका आयुक्तांनी 12 बीएएमएस खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची रूपये 40 हजार इतक्या एकत्रित मानधनावर नेमणूक केली आहे. या तीन ठिकाणी प्रत्येकी ८ तासासाठी १ खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटेल लेरिडामध्ये डॉ. तेजस थोरात, डॉ. मनिष सिंग, डॉ. आशिष सिंग, डॉ. मुकेश यादव यांची हॉटेल जिंजर येथे डॉ. सौरभ बचाटे, डॉ. संतोष शिंदे, डॉ. जयंत जाधव डॉ. विनोद सिंग तर भाईंदरपाडा येथील डी इमारतीमध्ये डॉ. सोनिया इंगळे, डॉ. शैलेश इंगळे, डॉ. समिधा गोरे, डॉ. मधुरा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading