TMC

ठाण्यातील विश्रामगृहासमोरच्या वर्तमानपत्र विक्री करणा-या स्टॉलवर ठाणे महापालिकेची कारवाई

ठाण्यातील विश्रामगृहासमोरच्या वर्तमानपत्र विक्री करणा-या स्टॉलवर ठाणे महापालिकेनं कारवाई केली आहे. ठाणे महापालिकेनं काही दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेच्या धर्तीवर एक परिपत्रक काढून वर्तमानपत्र विक्री करणा-यांना फेरीवाल्यांमधून वगळून सुरक्षित केलं होतं. मात्र तरीही महिला वर्तमानपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर कारवाई झाल्यामुळं वृत्तपत्रं विक्रेते चिंतीत झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या कारवाईचं वृत्त समजताच ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी या महिलेला घेऊन नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. त्यांना वर्तमानपत्रं विक्रेते फेरीवाल्यांमध्ये मोडत नसल्याचं पटवून दिलं. त्यानंतर नौपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी बेबीताई यांना पुन्हा स्टॉल लावण्याची परवानगी दिली. महापालिकेकडून होणारी ही कारवाई टाळण्यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियान प्रत्येक स्टॉल धारकांना ओळखपत्र देणार असल्याचं उन्मेश बागवे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *