police political shivsena

पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर १६० पोलीस कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर

वर्तकनगर येथील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांच्या स्थलांतराबाबत निर्माण झालेला पेच पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सुटला असून सुमारे १६० कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर करण्यात आलं आहे. वर्तकनगरमधील या पोलीस वसाहतीतील इमारती या काही वर्षापासून धोकादायक झाल्या होत्या. या इमारतींमधून ३३० पोलीस कुटुंबं जीव मुठीत धरून राहत होते. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून महापालिका त्यांना भाईंदरपाडा येथील लोढा वसाहतीच्या सदनिकांमध्ये स्थलांतरीत करणार होती. पण मुलांच्या शाळा वर्तकनगरमध्ये असल्यामुळं भाईंदरपाडा येथे जाण्यास या कुटुंबांची तयारी नव्हती. त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी महापालिका आयुक्त आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांशी चर्चा केली. या इमारती महापालिका आणि प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत नाहीत. परंतु नियमांच्या बागुलबुवापेक्षा लोकांचे प्राण अधिक महत्वाचे असल्यानं या कुटुंबांना वर्तकनगरमधील आकृती प्रकल्पामध्ये स्थलांतरीत करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी काल या वसाहतीला भेटही दिली. त्यामुळं या कुटुंबांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *